Thur, March 23, 2023

शंकर मोदगेकर यांना जीवनगौरव पुरस्कार
शंकर मोदगेकर यांना जीवनगौरव पुरस्कार
Published on : 9 February 2023, 9:58 am
विरार, ता. ९ (बातमीदार) : वसई तालुक्यातील प्रसिद्ध चित्रकार शंकर मोदगेकर यांना बेळगाव येथील नामवंत चित्रकार कलामहर्षी के. बी. कुलकर्णी यांच्या नावे देण्यात येणारा या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेळगाव येथील वरेरकर नाट्य संघाच्या कुलकर्णी दालनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. शंकर मोदगेकर यांच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांचे पुत्र समीर मोदगेकर यांनी तो स्वीकारला. या वेळी शंकर मोदगेकर यांना जीवनगौरव; तर पुण्याच्या अनघा देशपांडे यांना कलामहर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात अरुण दाभोलकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला व्यंगचित्रकार जगदीश कुंटे, प्रभाताई कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक दिलीप चिटणीस होते.