Sat, March 25, 2023

विक्रमगड हायस्कूलमध्ये मोफत सायकलींचे वाटप
विक्रमगड हायस्कूलमध्ये मोफत सायकलींचे वाटप
Published on : 9 February 2023, 9:59 am
विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) : विक्रमगड हायस्कूल येथे मानव विकास उपक्रमांतर्गत मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. विक्रमगड नगरपंचायत उपनगराध्यक्ष महेंद्र पाटील, नगरसेवक मनोज वाघ यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी हायस्कूलचे प्राचार्य अजित घोलप, पर्यवेक्षक पाटील, रमेश भोईर, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.