Tue, March 21, 2023

आलोंडेत आशीर्वाद समारंभ उत्साहात
आलोंडेत आशीर्वाद समारंभ उत्साहात
Published on : 9 February 2023, 11:47 am
विक्रमगड, ता. ९ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील आलोंडे येथे कुडुस विभाग शिक्षण सेवा संघाचे विनोद गार्डी स्वजन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आलोंडे येथे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आशीर्वाद समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वादरूपी मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील, माजी विद्यार्थी डॉ. हेमंत गुप्ता, डॉ. कुणाल भोईर, स्कूल कमिटी सदस्य शिवराम बोडके, जनार्दन भोईर, प्राचार्य पी. एन. भोईर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.