लोकलमध्ये चोरीच्या संशयावरून दोघांना चोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकलमध्ये चोरीच्या संशयावरून दोघांना चोप
लोकलमध्ये चोरीच्या संशयावरून दोघांना चोप

लोकलमध्ये चोरीच्या संशयावरून दोघांना चोप

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ७ : लोकल ट्रेनमध्ये चोरी करण्याच्या संशयावरून दोघांना अर्धनग्न करत प्रवाशांनी मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बदलापूर लोकलमध्ये ही घटना घडली असल्याचे समजत असून याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांकडे कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले. व्हायरल व्हिडीओच्या घटनेची सत्यता पडताळण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. दिवा ते डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली असल्याचे लोकलमधील इंडिकेटरवर दिसते आहे; मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे, हे अजून समोर आलेले नाही.