विजयनगरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य

विजयनगरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य

वसई, ता. ७ : वसई-विरार महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या नालेश्वर नगर रॉक गार्डन आणि विजयनगर या परिसरामध्ये सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिकांनी या बाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या; मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे राहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने कचऱ्याच्या समस्येवर आक्रमक भूमिका घेतली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपविभाग प्रमुख महेंद्र विश्वनाथ पाटील यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे. या भागामध्ये सर्वत्र कचरा पसरलेला आहे. येथील कोणत्याही परिसरात कचराकुंड्या उपलब्ध नाहीत. असे असताना परिसरातील नागरिक आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा रस्त्यावरच फेकतात. त्यामुळे येथे सर्वत्र कचरा दिसतो. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून रोगराई, दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात कचराकुंड्या पुरवल्या तर या परिसरातील घाण दूर होऊन लोकही निरोगी राहतील, असे ही पाटील यांनी म्हटले आहे. रहिवाशांना या गैरसोयींपासून वाचवण्यासाठी लवकरात लवकर कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्यांनी निवेदनामध्ये केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com