माता रमाई जयंती निमित्त महिला मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माता रमाई जयंती निमित्त महिला मेळावा
माता रमाई जयंती निमित्त महिला मेळावा

माता रमाई जयंती निमित्त महिला मेळावा

sakal_logo
By

गोरेगाव, ता. ९ (बातमीदार) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) महिला आघाडी वर्सोवा तालुक्याच्या वतीने गणेश नगर येथे मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला मेळाव्याचे व हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या रेश्मा खान, गोरेगाव तालुका अध्यक्ष रमेश पाईकराव व शीला आठवले व इतर अनेक महिला उपस्थित होत्या. या मेळाव्यात महिलांना प्रोत्साहन देण्याकरिता व त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, माता रमाई यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली.

घाटकोपरमध्ये रमाई जयंती साजरी
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात विविध सामाजिक संस्थांनी तसेच कामराज नगरमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रमाबाई आंबेडकर नगरात कुणाल तुरेराव तसेच इतर कार्यकर्त्यांच्या संकल्पनेनुसार दर वर्षी अशी जयंती साजरी केली जाते. या वर्षी एक रॅली काढण्यात आली होती. त्यात हजारो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते; तर कामराज नगरमध्ये जयंती साजरी करत महापुरुषांची पुस्तके आणि लाडूवाटप करून महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यासाठी बहुजन समाज पार्टीचे अनिल शिंदे यांच्यासह रेखा शिंदे, प्रवीण धोत्रे, संतोष अडसूळ, मीना कांबळे, ॲड. प्रणाली पाते आदी मान्यवर आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

दादर चौपाटी येथे स्वच्छता मोहीम
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः श्रीमती पी. एन. दोशी महिला महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने पुनीत सागर अभियानांतर्गत दादर चौपाटी येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत एनसीसीचे २१ कॅडेट्स सहभागी झाले होते. सर्व नियांमाचे पालन करत महाविद्यालयाच्या एनसीसीच्या अधिकारी कॅप्टन ज्योती माडये यांच्या देखरेखीखाली ही स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या वेळी स्वच्छता मोहिमेत किनाऱ्यावरील किमान ४०० किलो कचरा गोळा करून खतनिर्मितीसाठी सदर कचरा पालिकेकडे जमा करण्यात आला. ही मोहीम घनकचरा व्यवस्थापन चैत्यभूमी, दादरचे कनिष्ठ अवेक्षक विजय कांबळे आणि सुनील चितावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.