ठाण्यात आगीच्या दोन घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात आगीच्या दोन घटना
ठाण्यात आगीच्या दोन घटना

ठाण्यात आगीच्या दोन घटना

sakal_logo
By

ठाणे, ता. ८ (वार्ताहर) : कोपरी परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आगीच्या दोन घटना घडल्या. ठाणे पूर्वेतील ठाणेकरवाडीमध्ये दीप किरण सोसायटीमधील फिटनेस फॅक्टरी जिमच्या बॅनरला आग लागली. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आगीची दुसरी घटना लोकमान्यनगरमधील हरड चाळीतील घरामध्ये सिलिंडरमधून वायुगळतीने आग लागली होती. अग्निशमन दलाचे जवानांसह भारत गॅस कंपनी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट घेत आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेत घरातील भाडोत्री विनोद गिरधर हिरवळ (वय ४१) यांचे हात आणि डोके भाजल्याने किरकोळ जखमी झाले.