पालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई

पालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई

Published on

खारघर, ता. ८ (बातमीदार) : सेक्टर ३५ ई मधील साई मिराकल सोसायटीलगत पदपथावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी उभारलेल्या शेडवर पालिकेने कारवाई केली. लिटल वर्ल्ड मॉलसमोरील फेरीवाल्यांवर कारवाई करून दहा हातगाड्या आणि विक्रीसाठी आणलेले साहित्यदेखील जप्त केले आहे.
खारघर, सेक्टर ३५ ई, बँक ऑफ इंडियाशेजारील मिराकल सोसायटीलगत, तसेच खारघर सेक्टर ७, लिटिल वर्ल्ड मॉललगत पदपथावर काही बाहेरील फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून रेडिमेड कपडे, वडापाव, अंडाभुर्जी आणि चायनीज पदार्थविक्रेत्यांनी बेकायदा व्यवसाय थाटला होता. यासाठी शेड तसेच ग्राहकांसाठी आसनव्यवस्था उभारण्यात आली होती. त्यामुळे पदपथावरील या अतिक्रमणाविरोधात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी डॉ. स्वप्नील पवार यांनी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.