नागरी सेवांसाठी मुंबईत ‘म्युनिसिपल सॅंडबॉक्स’

नागरी सेवांसाठी मुंबईत ‘म्युनिसिपल सॅंडबॉक्स’

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई शहरातील नागरिकांना विविध सेवा पुरवताना नावीन्यपूर्ण संकल्पनांवर महापालिका काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत म्युनिसिपल सॅंडबॉक्स या संकल्पनेच्या उभारणी करण्यात येत आहे. एम पश्चिम विभागात पालिका अशा प्रकारचे पहिलेवहिले पाऊल उचलत आहे. महत्त्वाचे म्हणजे नागरी सेवा देण्यासाठी असे केंद्र उभारणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका आहे.
एखाद्या नागरी विषयाच्या समस्येवर एखाद्या ठिकाणी जमून एकत्रितपणे सोल्युशन काढणे म्हणजे सॅंडबॉक्स होय. तंत्रज्ञानाच्या साह्याने एखाद्या समस्येवर पर्याय काढण्यासाठी या संकल्पनेअंतर्गत घनकचरा विभागाअंतर्गत काम होणार आहे. त्यामध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही सोल्युशन देण्यावर भर असेल. यामुळे नागरी पायाभूत सुविधा आणखी मजबूत होणे शक्य होणार आहे. नावीन्यपूर्ण प्रयोगासाठी मुंबई महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्माईल काऊंसिलने आतापर्यंत घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि रुग्णालयांकरिता मेड टेक सोल्युशन आणि क्लीन टेक सोल्युशन पालिकेला पुरवले आहेत. ७ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पथदर्शी प्रकल्पांच्या उत्पादनाची पहिली बॕच महापालिकेकडे काही दिवसांपूर्वी सुपूर्द केली. महापालिकेचे बिझनेस इनक्युबेटर सध्या दुसऱ्या बॅचअंतर्गत स्लम सॅनिटेशन आणि महापालिकेच्या रुग्णालयात सिव्हिक मेड टेक सेंटर स्थापित करण्यावर काम करत आहे. येत्या मार्चपर्यंत स्टार्ट अप प्रोक्युरमेंट धोरणही तयार होणे अपेक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.