वर्षभरात ४७ टक्के नागरिकांची करणार तपासणी

वर्षभरात ४७ टक्के नागरिकांची करणार तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : असंसर्गजन्य रोगांच्या तपासणीसाठी महापालिकेने महत्त्वाची पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत वर्षभरात जवळपास ४७ टक्के नागरिकांची तपासणी करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. महानगरपालिकेच्या मुंबईकरांसाठी ‘आरोग्यम् कुटुंबम्’ हा सर्वसमावेशक दक्षता कार्यक्रमांतर्गत या तपासण्या केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत वस्ती पातळीवर पूर्वतपासणी करणे, जागरुकता वाढवणे, निरोगी जीवनशैलीला चालना देणे, नवीन उपचार पद्धतींच्या धोरणांचा अवलंब करणे, रुग्णकेंद्रीत दक्षता आणि देखरेख प्रणाली इत्यादी योजनांचा अवलंब करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार मुंबईत प्रत्येक ४ पैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि प्रत्येक ५ पैकी एका व्यक्तीला मधुमेह आहे. तसेच महानगरपालिकेने नुकत्याच केलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘स्टेप्स सर्वेक्षणानुसार’ मुंबईतील ३४ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाब; तर १८ टक्के लोकांमध्ये मधुमेह आढळून आला आहे. आरोग्यसेविकांच्या माध्यमातून शहरातील एकूण लोकसंख्येपैकी ३० वर्षांवरील व्यक्तींची २०२३-२४ मध्ये ४७ टक्के तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. उच्च रक्तदाबाच्या अंदाजित रुग्णसंख्येपैकी ५० टक्के रुग्णांना देखरेखीखाली आणणे आणि ५० टक्के इतका पाठपुरावा व नियंत्रण दर गाठणे हे लक्ष्य ठेवले आहे. नागरिकांच्या तपासणीसाठी आठवड्यातील एक दिवस बुधवार राखून ठेवण्यात येणार आहे. पालिकेने तपासणीसाठी उच्च रक्तदाब उपकरणे व संच खरेदी केले आहेत.
मुंबईकरांमधील उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अन्य असंसर्गजन्य रोगाच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी ‘आरोग्यम् कुटुंबम्’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत शहरातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेने १६ रुग्णालयांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह विशेष तपासणी केंद्र सुरु केली आहेत. त्याचा विस्तार सर्व रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेमार्फत आरोग्य स्वयंसेविका किंवा आशा सेविका या झोपडपट्टी आणि तत्सम वस्तीमध्ये घरोघरी जाऊन ३० वर्षावरील व्यक्तींची उच्च रक्तदाबासंबंधी तपासणी करणार आहेत. यामध्ये आढळणाऱ्या रुग्णांच्या पुढील उपचारासाठी आरोग्य सेविकांकडून पाठपुरावा करण्याबरोबरच त्यांना एचबीटी केंद्रात पाठवण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com