नोकरदारंसाठी वॉटर टॅक्सीची मासिक पास सुविधा

नोकरदारंसाठी वॉटर टॅक्सीची मासिक पास सुविधा

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : दक्षिण मुंबईत काम करणाऱ्या नोकरदारवर्गासाठी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. आता वॉटर टॅक्सीसाठी मासिक पास सुविधा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. मासिक पास खरेदी करणाऱ्यांना सवलतसुद्धा देणार असल्याची माहिती नयनतारा शीपिंग प्रायव्हेट लिमिटेडकडून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नयनतारा शीपिंग प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक दर्शन नेवरेकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले की, आमचा मुख्य उद्देश वॉटर टॅक्सीमार्फत दक्षिण मुंबईला- नवी मुंबई जोडण्याचा आहे. बहुतांश कार्यालये दक्षिण मुंबईत आहेत. इथे मोठ्या प्रमाणात नोकरदारवर्ग नवी मुंबईवरून ये-जा करतो; मात्र त्यांचा बराच वेळ प्रवासात वेळ वाया जातो. आता मंगळवारपासून आम्ही बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू कली. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि पैशांची बचतसुद्धा होणार आहे. यापूर्वी बेलापूर ते फोर्टपर्यंत खासगी कॅबमध्ये गेल्यास सुमारे ६०० ते ८०० रुपये खर्च येतो आणि रहदारीच्या परिस्थितीमुळे सुमारे दोन तास लागू शकतात. हार्बर मार्गावर वातानुकूलित गाड्या नाहीत. त्यामुळे वॉटर टॅक्सीमुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
...
पासाचे दर
गेटवे ते बेलापूरदरम्यान वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासचा तिकीट दर २५० रुपये आणि बिझनेस क्लासचा दर ३५० रुपये आहेत. पुढील महिन्यात पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वॉटर टॅक्सीचा मासिक पास खरेदी करणाऱ्यांना नियमित भाड्यात २० टक्के सूट देणार आहेत.
...
मंगळवारपासून बेलापूर ते गेट-वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहेत. आता नोकरदारवर्गांच्या सोयीसाठी लवकरच वॉटर टॅक्सीची मासिक पास सुविधा सुरू करणार आहोत.
- दर्शन नेवरेकर, व्यवस्थापक, नयनतारा शीपिंग प्रायव्हेट लिमिटेड
...
असे असणार वेळापत्रक
- बेलापूर सकाळी ८.३० वाजता सुटणार
- गेट-वेला-सकाळी ९.३० वाजता पोहोचणार
- गेट वे ऑफ इंडिया सायंकाळी ६.३० सुटणार
- बेलापूरला सायंकाळी ७.३० वाजता पोहोचणार
...
वेळेत बचत
प्रकार- खर्च रुपये- वेळ
अप आधारित टॅक्सी- ८०० - दोन तास
लोकल- १५ - १.२० तास
वॉटर टॅक्सी -२५०/३५०- १ तास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com