जावयाकडून सासूला मारहाण

जावयाकडून सासूला मारहाण

Published on

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : कोपरखैरणेमध्ये राहणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धेला तिच्या जावयाने व त्याच्यासोबत असलेल्या चार महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. विशेष म्हणजे या सर्वांनी तिला कारमध्ये डांबून पुणे येथे नेऊन त्याठिकाणीदेखील त्यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणात महिलेचा जावई संतोष शिंदे, रखमा हिरवे, जनाबाई शिंदे, सुरेखा ढेबे आणि शीतल हिरवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरखैरणे सेक्टर ४ मध्ये जिजाबाई गोरे (वय ६०) या राहण्यास आहेत. त्यांच्या विवाहित मुलीचे एक वर्षापूर्वीच निधन झाले. त्यांचा जावई संतोष कोंडिबा शिंदे हा पुण्यातील भोर येथील असून त्याचे एका महिलेसोबत संबंध असल्याची चर्चा जिजाबाई यांनी गावात पसरल्याची माहिती त्याला मिळाली होती. त्यामुळे संतप्त झालेला संतोष २८ जानेवारी रोजी चार महिलांना घेऊन कोपरखैरणे येथे आला होता. या सर्वांनी जिजाबाई यांच्या घरामध्ये जबरदस्तीने घुसून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांचा मुलगा रमेश गोरे त्यांना सोडवण्यासाठी आला असता, चारही महिलांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याला त्या ठिकाणावरून पिटाळून लावले. त्यानंतर संतोष आणि चार महिलांनी चर्चा करण्याच्या बहाण्याने जिजाबाईंना जबरदस्तीने कारमधून भोर येथे नेले. त्याठिकाणी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.