उसगाव शाळेत शौचालयाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उसगाव शाळेत शौचालयाचे उद्‍घाटन
उसगाव शाळेत शौचालयाचे उद्‍घाटन

उसगाव शाळेत शौचालयाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ९ (बातमीदार) : येथील प्रसाद चिकित्सा संस्थेने गणेशपुरी परिसरातील जिल्हा परिषद शाळांतील मुलांसाठी अद्ययावत शौचालय सुविधा पुरवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उसगाव येथील मराठी शाळेत विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या शौचालयाचे उद्‍घाटन गटशिक्षणाधिकारी नीलम पाटील व सरपंच संदीप खिराडे यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरातील बहुतांश शाळांमध्ये अपुऱ्या सोयीसुविधा आहेत. शौचालय नसल्यामुळे मुले व शिक्षकांची गैरसोय होते. अशा शाळांसाठी नवीन शौचालयाच्या उभारणीतून ग्रामीण विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी गणेशपुरी येथील गुरुदेव सिद्धपीठ प्रेरित प्रसाद चिकित्सा या धर्मदाय संस्थेतर्फे अद्यावत शौचालयांची उभारणी केलेली आहे. उद्‍घाटन सोहळ्यासाठी गट केंद्रप्रमुख प्रिया पाटील, गुरुदेव सिद्धपीठ तसेच प्रसाद चिकित्सा संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वृंद व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.