Sat, April 1, 2023

मुंबईमधून मिरज मेल गाडी सुरू करा
मुंबईमधून मिरज मेल गाडी सुरू करा
Published on : 9 February 2023, 11:18 am
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानच्या दर्शनासाठी जाण्यासाठी प्रवासी आणि वारकऱ्यांना मुंबईमधून मेल गाडी उपलब्ध नसल्याने गैरसोय होते. त्यामुळे मुंबईमधून मुंबई-पंढरपूर-मिरज मेल गाडी सुरू करण्याची मागणी श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री, आमदार यांना निवेदन देत मोहीम सुरू केली आहे. पंढरपूरला जाण्यासाठी मुंबई येथील वारकरी सांप्रदाय व प्रवाशांना जाण्याकरिता मुंबई येथून रेल्वे मेल गाडी नसल्याने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, टिटवाळा, मुरबाड, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, लाखो वारकऱ्यांची व प्रवाशांची गैरसोय होत असून मुंबई पंढरपूर विशेष मेल गाडी सुरू करण्याची मागणी केली आहे.