आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे यश

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे यश

Published on

शहापूर, ता. ९ (बातमीदार) : नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग योगासन स्पोर्ट कमिटीतर्फे पहिली ठाणे जिल्हास्तरीय दिव्यांग योगासन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी विविध शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा अंधप्रवर्ग, मूकबधिर प्रवर्ग, आर्थोपेडिकल अपंग, ओएच ए व ओएच बी, डेव्हलपमेंटली चॅलेंज प्रवर्ग या पाच प्रवर्गातून या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचालित आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आर्थोपेडिकली ओएच ए या प्रवर्गातून सहभाग घेत इयत्ता सहावीतील आगुस्तीन शेंडे याने योगासने सादरीकरण करून सुवर्णपदक; तर इयत्ता चौथीतील अर्पण भुसारे याने रौप्यपदक पटकावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.