लग्न सोहळ्यात चोराची हातसफाई

लग्न सोहळ्यात चोराची हातसफाई

Published on

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : वाशी, सेक्टर- १४ मधील गुजरात भवनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात एका चोरट्याने संधी साधून १ लाख ६० हजारांच्या रोख रकमेसह मोबाईल फोन व इतर कागदपत्रांची चोरी केली आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाशी, सेक्टर-१४ मधील गुजरात भवन येथे बुधवारी सायंकाळी वाशीत राहणाऱ्या तरुणीचा विवाह होता. विवाहानंतर हॉलमधील पहिल्या मजल्यावर रिसेप्शन हॉलमध्ये रात्री ९ च्या सुमारास वधू आणि वरांचा स्वागत समारंभ सुरू होता. या वेळी वधूच्या आईने १ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, मोबाईल फोन व इतर साहित्य असा सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे ऐवज असलेल्या दोन हँड बॅग खुर्चीवर ठेवल्या होत्या. त्यानंतर त्या नातेवाईकांशी गप्पा मारण्यासाठी बाजूला गेल्या असताना ही संधी साधून चोराने वधूच्या आईच्या दोन्ही हँड बॅग चोरून नेल्या. काही वेळानंतर वधूच्या आईने आपल्या हँड बॅगेची शोधाशोध सुरू केली; मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाल्याने त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर वधूच्या आईने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.