रेल्वे स्थानकांवर रंगांची उधळण

रेल्वे स्थानकांवर रंगांची उधळण

Published on

वाशी, ता. ९ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी विविध स्पर्धा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांबरोबरच रंगरंगोटीची कामे पालिकेने सुरू केली आहेत. स्वच्छ अभियान उपक्रमातून धूळ खात पडलेली सिडकोनिर्मित रेल्वेस्थानकांचे यंदा रुपडे बदलण्यात येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण-२०२३ ला सामोरे जात असताना शहरातील मरगळलेल्या रेल्वेस्थानकांना रंगरंगोटी व स्वच्छतेचे काम पालिकेने हाती घेतले आहे. महापालिकेच्यावतीने पहिल्या टप्प्यात निर्माणाधीन दिघा रेल्वेस्थानक आणि ऐरोली रेल्वेस्थानकांनंतर आता घणसोली रेल्वेस्थानकाची साफसफाई आणि विविध कलात्मक संकल्पनांमधून ट्रान्स हार्बर मार्गावरील स्थानकाच्या भिंती बोलक्या केल्या आहेत. अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या स्थानकांचे नवे रूप नवी मुंबईकरांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली रेल्वेस्थानकाला नवी झळाळी मिळाली आहे. या रेल्वेस्थानकाचा स्वच्छ भारत अभियानामधून कायापालट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याच अनुषंगाने घणसोली स्थानकाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे घणसोली रेल्वेस्थानकाला नवी झळाळी मिळाली असल्याचे दिसून येत आहे.
--------------------------------------
युवा संकल्पनांना व्यासपीठ
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपक्रमात शहराची छोट्या व मोठ्या नाल्यावर जाळ्या बसवून कचरा टाकण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. रस्त्याच्या लगत असणाऱ्‍या मोकळ्या भूखंडांवर संरक्षित जाळी बसवणे, चौक, पदपथ, उड्डाण पूल, पादचारी पुलांची रंगरंगोटी व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तरुण वर्ग नवनवीन संकल्पना घेऊन शहराला स्वच्छ, सुंदर व स्वच्छ करण्यासाठी रंगरंगोटीत तल्लीन झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
----------------------------------
आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वच्छ सर्वेक्षणात वैविध्यपूर्ण संकल्पना राबवण्यात येत असून नवी मुंबईकरांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवत देशात प्रथम क्रमांकाचे मानांकन उंचावण्यात हातभार लावावा.
- शंकर खाडे, सहाय्यक आयुक्त, घणसोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.