Sat, April 1, 2023

आदिवासी महिलांना संविधान साक्षरतेचे धडे
आदिवासी महिलांना संविधान साक्षरतेचे धडे
Published on : 12 February 2023, 12:53 pm
विरार, ता. १२ (बातमीदार) : विवेक सामाजिक संस्थेमार्फत पालघर जिल्ह्यातील दुकटन गावातील बांबूपासून हस्तकला प्रावीण्य मिळवलेल्या आदिवासी महिलांना संविधान साक्षरता मोहिमेअंतर्गत संविधानाचे महत्त्व व फायदे याचे मार्गदर्शन सेवा विवेकचे मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे यांच्यामार्फत करण्यात आले. त्या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुरा पतंगे उपस्थित होत्या. संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे कायदे शब्दात बांधून ठेवले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य तसेच उत्तम शिक्षण घेण्याचे अधिकार आपल्या सर्वांना संविधानाने दिले आहेत. धर्म जगावा लागतो तसे संविधान जगावे लागते. संविधानाचे रक्षण केले, तर संविधान आपले रक्षण करते, असेही पतंगे यांनी सांगितले.