शिक्षक निवडणुकीतील विजयाने महाविकास आघाडीचे मनोबल वाढले

शिक्षक निवडणुकीतील विजयाने महाविकास आघाडीचे मनोबल वाढले

Published on

घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः नुकत्याच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे मनोबल वाढले आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
कुर्ल्याचे माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेश सरचिटणीस संजीव उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी आमदार मिलिंद कांबळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या; तसेच मिलिंद अण्णा पुन्हा कुर्ला विधानसभेतून आमदार होतील, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, हरीश सणस, रमेश परब आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.