विनाअनुदानित शाळांसाठीच्या जाचक अटी दूर करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनाअनुदानित शाळांसाठीच्या जाचक अटी दूर करण्याची मागणी
विनाअनुदानित शाळांसाठीच्या जाचक अटी दूर करण्याची मागणी

विनाअनुदानित शाळांसाठीच्या जाचक अटी दूर करण्याची मागणी

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ (बातमीदार) ः कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधानभवनात शपथविधी आटोपताच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या वेळी विनाअनुदानित शाळांसाठी ६ फेब्रुवारीला काढलेल्‍या जीआरमधील अटी दूर करण्याची मागणी केली. यावर शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन देत अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देत असल्याचे सांगितले. यावेळी विनाअनुदानित शाळा कृती समिती कार्याध्यक्ष पुंडलिक राहटे उपस्थित होते.
६ फेब्रुवारीला शासनाने अनुदान मंजूर केल्याचा शासन निर्णय मंजूर केला. या जीआरमधील शाळांची तपासणी रद्द करावी; तसेच २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता अजून कोणत्याच शाळेला न मिळाल्याने २०१८-१९ ची संचमान्यता ग्राह्य धरून तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.