बोईसरमध्ये स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसरमध्ये स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्‍घाटन
बोईसरमध्ये स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्‍घाटन

बोईसरमध्ये स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

बोईसर, ता. १२ (बातमीदार) : भीमनगर बोईसर (पश्चिम) येथे आयोजित जिजाऊ यूपीएससीसी, एमपीएससी स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे व यशवंत सृष्टी, बोईसर, पालघर रोड येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश भगवान सांबरे यांच्या हस्ते पार पडले. या उद्‍घाटन सोहळ्यानिमित्त सर्कस ग्राऊंड, तारापूर रोड, बोईसर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. झडपोलीतील जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा येथील अंध व मतिमंद विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. बोईसर विभागातील भीमनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने उपस्थित अतिथी व मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील जिजाऊ महिला मंडळातील महिलांनी पथनाट्य सादर केले. महिलांनी व लहान मुला-मुलींनी नृत्य, गायन व भाषणदेखील केले. तसेच अंगणवाडी सेविका ताई व ग्रामपंचायत विभागातील स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.