के. व्ही. हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण समारंभ

के. व्ही. हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण समारंभ

Published on

जव्हार, ता. ९ (बातमीदार) : जव्हार येथील के. व्ही. हायस्कूल शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाला शाळेचे माजी विद्यार्थी कॅप्टन विनीत मुकणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. के. व्ही. हायस्कूल व आर. वाय. जुनियर कॉलेजच्या ४६८ विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला. पैकी १५६ विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक मिळवले, १५६ विद्यार्थ्यांना द्वितीय; तर १५६ विद्यार्थ्यांनी तृतीय पारितोषिक मिळवले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये १५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापैकी ४७ विद्यार्थ्यांनी प्रथम, ५२ विद्यार्थ्यांनी द्वितीय; तर ५६ विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवले. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना उद्योजक कॅप्टन विनीत मुकणे यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य तथा जव्हार केंद्राचे ब्रँच सेक्रेटरी डॉ. एम. आर. मेश्राम होते. प्रास्ताविक किशोर सावकारे यांनी केले. अहवाल वाचन प्राचार्य दिलीप उदमले यांनी; तर पर्यवेक्षक सुरेश वाल्हे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैभव खंडागळे व शीतल अहिरे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.