व्हॅलेंटाइन डे’ केकमुळे स्पेशल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हॅलेंटाइन डे’ केकमुळे स्पेशल
व्हॅलेंटाइन डे’ केकमुळे स्पेशल

व्हॅलेंटाइन डे’ केकमुळे स्पेशल

sakal_logo
By

तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : फेब्रुवारी महिना आला की तरुणांना वेध लागतात व्हॅलेंटाईन डेचे. त्यामुळे प्रिय व्यक्तीला चांगली भेटवस्तू देण्यासाठी गिफ्ट शॉप, ऑनलाईन शॉपिंग साईटवर आतापासून काहीतरी वेगळे घेण्याचा कल अनेकांचा असतो. अशातच बाजारात विविध आकाराचे केकदेखील आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.
व्हॅलेंटाईनसाठी बनवण्यात आलेल्या केकची किंमत ३०० रुपयांपासून सुरू होत असून तो पाच हजारांच्या घरात आहेत. आपल्याला हवा तसा हवा त्या आकाराचा केक तयार करून दिला जावा यासाठी तरुणाईकडून आधीच बुकिंग करून ऑर्डर दिल्या जात आहेत. आवडत्या व्यक्तीचा फोटो केकवर टाकण्याचा तसेच रेड रोझ केकवर छापण्याकडेही तरुणांचा कल आहे. डॉल केक, चॉकलेट, किटकॅट, चेकमेट केकला मागणी वाढली आहे. हव्या त्या आकारातील, हवे ते नाव आणि फोटो टाकण्याचीही सोय असलेले हे केक तरुणाईचे आकर्षण ठरत आहेत. रेड वेलवेट केक हा बाजारात नवीन आला असून त्याची मागणी वाढली आहे.
------------------------------
विविध पर्यायांना मागणी
रोझ, चॉकलेट, पायनापल, स्टॉबेरी यासह बहुतांश फ्लेवर एकत्रित असलेला व्हॅलेंटाईन स्पेशल ‘हार्ट शेप’ केक आकर्षण ठरत आहे. तसेच ‘चेकमेट’, ट्रॅफिक जॅम’, ‘रोझ शेप’, ‘नट बटरस्कॉच’, ‘डच ट्रपल’, ‘रिच प्लॅब’ अशा अनेक प्रकारच्या केकची बुकिंग व्हॅलेंटाईन डे’च्या आधीच सुरू झाली आहे.