भिवंडीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
भिवंडीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

भिवंडीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

sakal_logo
By

भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भिवंडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय कोणार्क आर्केड येथे बनविण्यात आले असून या कार्यालयाचे उद्‌घाटनदेखील प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आठवडाभर ही सेवाभावी कामे सुरूच राहणार आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले असल्याची माहिती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.