हृदयी वसंत फुलताना...प्रेमास रंग यावे !

हृदयी वसंत फुलताना...प्रेमास रंग यावे !

नवीन पनवेल, ता. ९ (वार्ताहर)ः ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तरुणाईची जय्यत तयारी सुरू आहे. कुठे, कधी आणि कोणते गिफ्ट द्यायचे याचे आराखडे बांधले जात आहेत. अनेकांनी भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सोयीसाठी बाजारातील अनेक दुकाने लाल-गुलाबी रंगांच्या वस्तूंनी सजली आहेत; तर आठवडाभरापासून समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या संदेशांमधून प्रेम व्यक्त करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.
तरुणाईच्या मनामनांतील भावना ‘व्हॅलेंटाईन डे’ वीकच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करीत व्यक्त करण्यात येत आहेत. एक आठवडाभर युवावर्गात विविध डे साजरे करण्यासाठी जणू स्पर्धाच दिसून येत आहे. त्यामुळे तरुणाई आजच्या हायटेक युगात सोशल मीडियावर अधिक सक्रिय असलेल्या तरुणांकडून विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह विविध माध्यमांवर युवक-युवती पोस्ट व्हायरल करण्यात मग्न असल्याचे चित्र पनवेलसह नवी मुंबई परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे युवावर्ग सोशल मीडियावर डे साजरा करण्यात दंग असल्याचे दिसून येत आहे.
--------------------------
प्रेमपत्र काळाच्या पडद्याआड
आपल्या आवडत्या व्यक्तीला हटके पद्धतीने प्रपोज करावे, असे प्रत्येकाला वाटते. पूर्वी प्रेमपत्र, तसेच गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त केले जात होते. आता मात्र, यांत्रिक युगात प्रेमपत्राची जागा मेसेजने घेतली आहे. त्यामुळे प्रपोज डेच्या दिवशी मोबाईलवर फिल्मी डायलॉगचा भडिमार होणार आहे. त्यामुळे प्रेमाची कबुली देण्याचे विविध फंडे तरुणाई वापरत आहे. डिजिटलमुळे जरी हे सगळे सोपे झाले असले तरी प्रेमपत्र हा प्रकार इतिहासजमा आहे.
----------------------------------
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमीवर पनवेल बाजारात विविध रंगांची गुलाबाची फुले उपलब्ध झाली आहेत. आता आठवडाभर या फुलांना चांगली मागणी राहणार आहे. त्यामुळे १० रुपयांना मिळणारे लाल गुलाब १५ ते २० रुपये प्रतिनग होण्याची शक्यता आहे.
- रमेश भारद्वाज, फूल विक्रेता, पनवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com