Tue, March 21, 2023

मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस गाडीच्या डब्याला आग
मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस गाडीच्या डब्याला आग
Published on : 9 February 2023, 2:30 am
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : मुंबई-हैद्राबाद एक्स्प्रेसला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान मुंबई-हैद्राबाद एक्स्प्रेसच्या डी-१ या वातानुकूलित डब्याखालून दुपारी ३च्या सुमारास धूर निघू लागला, यावेळी प्रवाशांनी चेन खेचत गाडी थांबवली. यावेळी काही प्रवाशांनी डब्याखाली उड्या मारल्या. प्रवाशांनी तत्काळ या आगाची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर रेल्वेतील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आग विझवल्यानंतर कल्याण स्टेशनवर गाडीची पुन्हा तपासणी करत गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती स्टेशन मास्तरांनी दिली.