उत्कर्ष विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्कर्ष विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद
उत्कर्ष विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

उत्कर्ष विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

sakal_logo
By

विरार, ता. ९ (बातमीदार) : विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्कर्ष विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग यांच्या विज्ञान व कार्यानुभव प्रदर्शनाला विद्यार्थांनी मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन संस्थेचे खजिनदार शिखर ठाकूर यांच्या हस्ते चंद्रयान उड्डानाचे प्रात्यक्षिक करून करण्यात आले. या प्रदर्शनात ‘पर्यावरण वाचवा, देश वाचवा’ या विषयावर आधारित अनेक चलत प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. या उद्‍घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माणिकपूरच्या केंद्रप्रमुख स्वाती पागधरे उपस्थित होत्या. या प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून शिक्षिका नमिता वर्तक, रुचिता सूर्यवंशी, योगिनी राणा, संगीता मोदी, तसेच पालक प्रतिनिधी म्हणून यशस्वी जाधव या उपस्थित होत्या. संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच पूर्व व पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भक्ती वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या वेळी संस्थेच्या मार्गदर्शिका कल्पना राऊत, चारुता चुरी, चित्रा ठाकूर, मुग्धा लेले, नीता खाडे, ट्रिझा डिमेलो, अंजू मिश्रा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.