भारत २०४७ पर्यंत मुस्लिम राष्ट्र!

भारत २०४७ पर्यंत मुस्लिम राष्ट्र!

मुंबई, ता. ९ : प्रतिबंधित संघटना पीएफआयवर कारवाई केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पाच आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. यापैकी मजहर मन्सूर खान या आरोपीच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या फाईलमध्ये २०४७ पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र घोषित करण्याबाबतचा मजकूर आणि त्याबाबतची कार्यपद्धती नमूद असल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला. तसेच आरोपींच्या मोबाईलमध्ये पेट्रोल बॉम्ब बनवण्यापासून तलवार, लाठी, कराटे प्रशिक्षणापर्यंतचे अनेक व्हिडीओ सापडल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे.
‘एटीएस’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात पीएफआय कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या माहितीनुसार, संघटनेचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी चार टप्प्यांत काम करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मुस्लिम समाजाच्या हिताची काळजी घेणे कसे आवश्यक आहे, भारतात आपल्यावर कसा अन्याय होतो, हे सांगून संघटनेमध्ये अधिकाधिक लोकांना जोडले पाहिजे, याशिवाय सदस्यांना तलवार, रॉडद्वारे हल्ला कसा करावा, याबाबत प्रशिक्षण दिल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या टप्प्यात विरोधकांना घाबरवण्यासाठी विशेष कॅडरच्या माध्यमातून हिंसाचार करावा, त्यासाठी कार्यकर्त्यांना स्फोटकांचे प्रशिक्षण द्यावे, असेही म्हटले आहे. तिसऱ्या टप्प्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांशी मैत्री करून निवडणुकीत उमेदवार उभा करून त्याला विजयी करा, त्यानंतर विजयी उमेदवाराच्या मदतीने संघटना व पक्ष वाढवावा आणि चौथ्या टप्प्यात मुस्लिम समाजाला एकत्र आणून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व करून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करण्याचे म्हटले आहे.
---
बॉम्ब बनवण्याचा व्हिडीओ
एटीएसच्या तपासात आरोपी मोहम्मद इक्बाल मोहम्मद इब्राहिम खान याच्या मोबाईलमध्ये अनेक धक्कादायक व्हिडीओ सापडले. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये पेट्रोल बॉम्ब कसा तयार करावा, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये काही महिला लाठ्या चालवताना दाखवल्या आहेत. तसेच एका व्हिडीओमध्ये मुस्लिमांनी भारत सरकारविरोधात एकजूट व्हावे आणि पीएफआयमध्ये सामील व्हावे, असे आवाहन मौलाना अहमद नदवी लोकांना करताना दिसत असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
---
मंदिर-मशिदीचा उल्लेख
आरोपी इक्बाल खानच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी जिथे पूर्वी मशीद होती, तिथे आता मंदिर असल्याचे म्हटले आहे. या माहितीचा वापर करून आरोपी भविष्यात हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, असा एटीएसला संशय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com