‘गेट वे ऑफ इंडिया’चे लवकरच सुशोभीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गेट वे ऑफ इंडिया’चे लवकरच सुशोभीकरण
‘गेट वे ऑफ इंडिया’चे लवकरच सुशोभीकरण

‘गेट वे ऑफ इंडिया’चे लवकरच सुशोभीकरण

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांमध्ये गेटवे ऑफ इंडियाचाही समावेश आहे. आगामी वर्षात २०२४ रोजी या वास्तूला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असणारा हा परिसर आगामी काळात आणखी आकर्षक दिसणार आहे.
महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात सुशोभीकरणासाठी विशेष तरतूद केली आहे. येथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावणाऱ्यांसाठी हा परिसर वेगळाच अनुभव देणारा ठरणार आहे. सुशोभीकरणाच्या कामासाठी याआधी १३ सप्टेंबरला सह्याद्री अतिथिगृह येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुशोभीकरणाच्या अनुषंगाने या बैठकीत निर्देश दिले. त्यानुसार गेट वे ऑफ इंडिया परिसर कलात्मकदृष्ट्या कसा सादर करता येईल, यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया कमानीवर असलेली कलाकुसर लक्षात घेऊनच ही संलग्न कामे होणार आहेत. त्यामध्ये परिसरातील जंक्शनचेही सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. रिगल सिनेमासमोरील जंक्शनच्या ठिकाणी सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येतील. त्यामध्ये पादचाऱ्यांचा विचार करूनच स्टॅम्प काँक्रीटमधील पदपथ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
...
ऐतिहासिक वास्तू
गेट वे ऑफ इंडिया या वास्तूची उंची २६ मीटर इतकी आहे. इंडो सॅरसेनिक वास्तुशिल्प कलेचा हा नमुना आहे. जवळपास आठ मजली इमारतीइतकी उंची असून बांधकाम सन १९११ मध्ये सुरू होऊन १९२४ मध्ये पूर्ण झाले होते. तेव्हापासून भारताचे प्रवेशद्वार म्हणून या वास्तूने आपली वेगळी ओळख तयार केली.