दोन अट्टल चोर गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन अट्टल चोर गजाआड
दोन अट्टल चोर गजाआड

दोन अट्टल चोर गजाआड

sakal_logo
By

मनोर, ता. ९ (बातमीदार) : बोईसरमध्ये बंद घरात चोरी करणाऱ्‍या दोन अट्टल गुन्हेगारांना गजाआड करण्यात बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. आतिष दत्ताराम साखरकर आणि राहुल गिरीश राठोड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस तपासात दोघांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली असून घरफोड्या करीत रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून लाखो रुपयांचा ऐवज चोरी केल्याचे कबूल केले.
बोईसर शहर आणि लगतच्या परिसरात गेल्या दोन तीन महिन्यांपासून चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. बोईसर पोलिस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले होते. चोरी झालेल्या परिसरातील सीसी टीव्ही फुटेज तपासले असता चोरी करण्याचा एक सारखी पद्धत वापरत असल्याचे लक्षात आल्यावर बोईसर पोलिसांनी शनिवार आणि रविवारी संध्याकाळच्या वेळेस गस्त वाढवून आरोपींचा शोध सुरू केला होता.
तेव्हा सीसी टीव्ही फुटेजमधील दोन्ही संशयित आरोपी एका दुकानाजवळ फिरत असल्याचे लक्षात आल्यावर वाकचौरे यांनी त्यांना चौकशीसाठी थांबण्याचा इशारा केला. तेव्हा या संशयितांनी उलट पोलिसावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला; तर दुसरा चोर झटापटीचा फायदा घेत रेल्वे स्टेशनकडे पळाला. यातील एकाला पोलिस अंमलदार संतोष वाकचौरे यांनी शिताफीने चोराच्या मुसक्या आवळल्या. लोकलने पळून गेलेल्या दुसऱ्‍या चोराला पालघर स्टेशन येथे पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरांकडून पाच लाख ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे.