रविवारी राष्ट्रवादीला खिंडार पडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविवारी राष्ट्रवादीला खिंडार पडणार
रविवारी राष्ट्रवादीला खिंडार पडणार

रविवारी राष्ट्रवादीला खिंडार पडणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह चार माजी नगरसेवक आणि एक अपक्ष माजी नगरसेवकाची पत्नी देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात रविवारी (ता. १२) प्रवेश करणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी सोडत असताना लोकमान्यनगर, शास्त्री नगर भागाचा विकास करण्यासाठी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष सोडत असताना कोणालाही दोष देणार नसल्याचे हणमंत जगदाळे यांनी स्पष्ट केले. यामुळे राष्ट्रवादीला लोकमान्यनगर पट्ट्यात मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील राष्ट्रवादीचे १५ ते १६ माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होण्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यात या पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील राष्ट्रवादीचे १२ वाजणार असल्याचा इशारा दिला होता. अशातच राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील प्रमुख पदाधिकारी हजर राहिल्याने मुल्ला देखील विरोधात गेले की काय? अशी चर्चा जोर धरू लागली होती; तर लोकमान्य नगर भागातील हणमंत जगदाळे यांनी इतर तीन सहकाऱ्यांना हाताशी घेत राष्ट्रवादीचे घड्याळ काढण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण पक्षांतर करणार?
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे, सुधाबाई जाधवर, दिगंबर ठाकूर, वनिता घोंगरे आदींसह परिवहन विभागाचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडित, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, संदीप घोगरे आदींसह दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती हणमंत जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.