शिवळे येथे मोफत आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवळे येथे मोफत आरोग्य तपासणी
शिवळे येथे मोफत आरोग्य तपासणी

शिवळे येथे मोफत आरोग्य तपासणी

sakal_logo
By

मुरबाड, ता. १२ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवळे येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ सुमारे ५०० व्यक्तींनी घेतला. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सरकारच्या आरोग्यविषयक योजना, सुदृढ बालक व सुजन पालक योजना, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनांचा शुभारंभ पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्‍यात आला. या शिबिरात आरोग्य अधिकारी डॉ. भंडारी, तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे, बालतज्‍ज्ञ मुकेश पाटील, स्त्री रोग तज्‍ज्ञ डॉ. मुंडे, गोपाळकृष्ण ट्रस्ट कॅन्सर निदान टीमचे डॉ. स्वप्नील, नेत्र तपासणी पथकाचे इन फिगो आय केअर सेंटरचे पटेल, डॉ. भारती बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
---------------------------------------
मुरबाड : शिवळे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.