‘व्हॅलेंटाइन डे’ची तरुणाईला वेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘व्हॅलेंटाइन डे’ची तरुणाईला वेड
‘व्हॅलेंटाइन डे’ची तरुणाईला वेड

‘व्हॅलेंटाइन डे’ची तरुणाईला वेड

sakal_logo
By

नेरूळ, बातमीदार
-----------------------------------
व्हॅलेंटाइन वीक सुरू झाला असल्याने तरुणाईची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे आत्तापासून प्रेमाचा दिवस सेलिब्रेट करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. या दिवसाचे महत्त्व जपण्यासाठी सुंदर अशा भेटवस्तूसोबतच विविध चॉकलेटचे प्रकार, भेटकार्ड, टेडीबिअर, केक अशा वस्तूंनी बाजार सजला आहे. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठीचा दिवस साजरा करण्याचे विविध बेत आखले जात आहेत.
----------------------------------------
‘व्हॅलेंटाइन डे’केवळ तरुण-तरुणींमध्ये साजरा केला जातो असे नाही, तर आई, वडील, बहीण, भाऊ, मित्र-मैत्रिणींतील प्रेम यादिवशी व्यक्त करता येते. मात्र, काही वर्षांपासून केवळ तरुणाईच्या या दिवसाच्या वलयात गुरफटून गेली आहे. अनेकांनी या दिवसानिमित्त विविध बेल आखले आहेत. त्यात व्हॅलेंटाईन पार्टी, गेट टूगेदर केले जाणार आहे. त्यामुळे विविध हॉटेल्स, रेस्टॉरंटकडून देखील व्हॅलेंटाइन डे साठी विविध ऑफर्सही दिल्या आहेत. तर यादिवशी हटके दिसण्यासाठी लाल रंगांचे कपडे खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी होत आहे. प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी तरुणाई पार्लरकडे जात आहे. प्रत्येक तरुणाईने मित्र-मैत्रिणीने ग्रुपनुसार थीम ठरवून लाल, काळा या रंगांची थीम ठरवून ‘व्हॅलेंटाइन डे’साजरा करायचा असे ठरवले आहे.
-----------------------------------------
विविध फ्लेवर्सचे चॅाकलेट
चॉकलेट्‌सची क्रेझ यंदाच्या व्हॅलेंटाईनला शुभेच्छापत्रांबरोबरच विविध फ्लेवर्सच्या चॉकलेट लाभणार आहे. विविध शॉपीज्‌मध्ये अशा फ्लेवर्समधील चॉकलेट उपलब्ध झाली आहेत. त्यात हॅंडमेड चॉकलेटसह इर्म्पोटेड चॉकलेटचा समावेश असून, चॉकलेटचे आकर्षक बॉक्‍स गिफ्ट म्हणून देण्यावर अनेक जण भर देत आहेत.
-------------------------------
शुभेच्छापत्रांचे मुख्य आकर्षण
गिफ्ट आर्टिकलमध्ये प्रेमाचा संदेश म्युझिकल टेडीही बाजारात उपलब्ध असून तरुणाईला भुरळ घालत आहे. विशेषतः लाल-गुलाबी रंगाच्या गिफ्टस्‌ना यंदाही विशेष मागणी राहणार असल्याने त्यातील वेगळेपण लक्षवेधक ठरत आहे. शुभेच्छापत्रांपासून ते विविध गिफ्ट आर्टिकलवर त्याचा नक्कीच प्रभाव आहे. तर अनेकांनी या दिवशी लग्नाचे मुहूर्त देखील साधले आहेत.
------------------------------------
विविध ऑफर्सचा पाऊस
‘व्हॅलेंटाइन डे’चे निमित्त साधून रेस्टॉरंटमध्ये प्रेमी जोडप्यांसाठी विशेष ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. व्हॅलेंटाईन स्पेशल डिनर, एकावर एक फ्री, तसेच काही प्रमाणात डिस्काउंट अशा ऑफर ठेवण्यात आल्यामुळे रविवारी अनेक प्रेमी जोडपी व्हॅलेंटाईन डिनरसाठी विविध ऑफर्सचा रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणार आहेत.