महेश कदम, नितीन वाघमारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

महेश कदम, नितीन वाघमारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मनसेचे ठाणे शहरातील माजी विभाग अध्यक्ष व कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या २०१९ च्या निवडणुकीतील उमेदवार महेश कदम व भीम आर्मीचे ठाणे जिल्हाप्रमुख नितीन वाघमारे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये आज प्रवेश केला. भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. मनसेबरोबरच महेश कदम यांनी स्वामी फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य केले आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच कदम यांनी २०१७ मधील महापालिकेची निवडणूकही लढवली होती; तर भीम आर्मीचे जिल्हाप्रमुख नितीन वाघमारे यांनाही अनेक विकासात्मक कामे केली आहेत. या वेळी महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, भाजपाचे प्रदेश सचिव संदीप लेले, माजी नगरसेवक सुनेश जोशी, ठाणे परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, भाजपाचे शहर सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com