किल्ले पद्मदुर्गावर गडसंवर्धन व स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले पद्मदुर्गावर गडसंवर्धन व स्वच्छता मोहीम
किल्ले पद्मदुर्गावर गडसंवर्धन व स्वच्छता मोहीम

किल्ले पद्मदुर्गावर गडसंवर्धन व स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

वाडा, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील गडकिल्ले संवर्धनावर काम करणारी संस्था शिवस्मरण प्रतिष्ठान अंबाडी ह्या संस्थेच्या वतीने किल्ले पद्मदुर्गवर गडसंवर्धन व स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवली. या वेळी गडाच्या बुरुज व भिंतींवर असलेली अनावश्यक व घातक झाडे मुळापासून तोडून काढली. किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यांमधील गाळ व शेवाळ काढून पाण्याच्या टाक्या साफ केल्या. तसेच किल्ल्याच्या आतील व बाहेरील भागातील कचरा व प्लॅस्टिक बॉटल जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. या मोहिमेसाठी संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १४ सदस्यांनी सहभाग घेतला.