खड्ड्यांमुळे वाहनचालक मेटाकुटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्यांमुळे वाहनचालक मेटाकुटीला
खड्ड्यांमुळे वाहनचालक मेटाकुटीला

खड्ड्यांमुळे वाहनचालक मेटाकुटीला

sakal_logo
By

घणसोली, ता. १४ (बातमीदार)ः विभागातील काही रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांसह वाहनचालकांचे हाल होत आहेत.
नवी मुंबईतील अनेक गावांचा विकास झाला आहे. रस्ते काँक्रीटीकरण झाले; परंतु सर्वात मोठ्या असलेल्या घणसोली गावातील प्रमुख रस्ते अजूनही विकसित झाले नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. घणसोली विभागातील वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा शेतकरी शाळा ते हनुमान मंदिरापर्यंत रस्ताचे काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून जोर धरू लागली आहे. अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच या रस्त्याच्या दुतर्फा युटिलिटी डक्ट नसल्याने वाहिन्या टाकण्यासाठी वारंवार रस्ता खोदण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक त्रस्त आहेत.
ः----------------------------------------
शेतकरी शाळा ते हनुमान मंदिरापर्यंत हा रस्ता घणसोली विभागातील मुख्य समजला जातो. या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले नसल्याने वाहनचालकांना अडचणी निर्माण होत आहे.
- गणेश सकपाळ, समाजसेवक