Mon, March 27, 2023

बरोरा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
बरोरा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
Published on : 12 February 2023, 10:48 am
शहापूर, ता. १२ (बातमीदार) ः शहापुरातील म. ना. बरोरा विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्र्विनी पांढरे, सानिका घोडविंदे, स्नेहल मडके यांनी केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक दत्तात्रय किरपण, संस्थेचे सचिव रमेश वनारसे, रामराव खैरे, विजय पडवळ, महेश गूजरे, राजेंद्र ठोके, रवींद्र सैदाने, विजयश्री विशे, रूपाली बरोरा आदी शिक्षक उपस्थित होते.