Tue, March 21, 2023

किन्हवलीत उद्यापासून सरपंच चषकाचे आयोजन
किन्हवलीत उद्यापासून सरपंच चषकाचे आयोजन
Published on : 12 February 2023, 10:49 am
किन्हवली, ता. १२ (बातमीदार) : किन्हवली ग्रामस्थ मंडळ व विलास स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (ता. १४) ते सोमवार (ता. २०) पर्यंत सरपंच चषक किन्हवली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किन्हवली येथील गुरुकुल मैदानावर होणाऱ्या या सामन्यांचे मंगळवारी सकाळी ९:०० वाजता उद्घाटन होणार असून प्रथम पारितोषिक ५५ हजार ५५५ रुपये रोख सरपंच सचिन कुंदे यांच्याकडून; तर रवी वेखंडे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक २५ हजार रुपये रोख आणि आयोजक मंडळाकडून तृतीय पारितोषिक १५ हजार एक रुपये असे असल्याचे निमंत्रक सरपंच सचिन कुंदे यांनी सांगितले आहे.