
‘वंदे भारत’चे दरवाजे न उघडल्याने गैरसोय
मुंबई, ता. १२ : साईनगर शिर्डी - मुंबई ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये दुसऱ्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली. शिर्डीहून आलेल्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना ठाणे आणि दादर रेल्वेस्थानकावर गार्ड केबिनमधून उतरण्याची वेळ आली. या संदर्भातील व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला असून ही घटना कशी घडली, याबाबत रेल्वेकडून अधिकृत माहिती समोर आली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १०) मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे उद्घाटन झाले. त्यानंतर रविवारी शिर्डीहून सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांने शिर्डीमधून निघालेली रात्री १० वाजून ०५ मिनिटांनी ठाण्याला पोहोचल्यानंतर गाडीचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांचा आरडाओरडा सुरू झालेला होता. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी प्रवाशांना गार्ड केबिनमधून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर रात्री १०.२८ वाजता दादर स्थानकावरही या दरवाजे न उघडले नाही. या संदर्भात एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून ही घटना कशामुळे घडली, याबद्दल रेल्वेकडून अधिकृत समोर आली नाही.