प्राथमिक शाळा फांगळोशी शाळेचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक शाळा फांगळोशी शाळेचे यश
प्राथमिक शाळा फांगळोशी शाळेचे यश

प्राथमिक शाळा फांगळोशी शाळेचे यश

sakal_logo
By

मुरबाड, ता. १३ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील फांगळोशी येथील प्राथमिक शाळेची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. ठाणे जिल्हा परिषद व राज्य विज्ञान परिषद नागपूर यांच्‍या मार्गदर्शनाखाली सुवर्ण महोत्सवी जिल्हा विज्ञान प्रदर्शन सिम्बॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कौसा मुंब्रा येथे पार पडले. विज्ञान प्रदर्शनात दर्जेदार प्रकल्पांची मांडणी करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगळोशी या शाळेचा विज्ञान खेळणी व शैक्षणिक साहित्य, ऊर्जा व ऊर्जेची रूपे या दोन प्रकल्पांची निवड करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातून त्यांच्या प्रकल्पाला द्वितीय पारितोषिक मिळाले. इयत्ता सातवीमधील विद्यार्थी अर्जुन फनाडे व यश फर्डे यांनी हे प्रकल्प तयार केले होते. शिक्षक पांडुरंग भोईर यांनी त्‍यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
--------------------------------------
मुरबाड : तालुक्यातील फांगळोशी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेला प्रकल्प.