Thur, March 23, 2023

‘प्रस्तरारोहणातील सुरक्षा’वर रंगला भटकंती कट्टा
‘प्रस्तरारोहणातील सुरक्षा’वर रंगला भटकंती कट्टा
Published on : 13 February 2023, 12:24 pm
ठाणे, ता. १३ (बातमीदार) : ठाण्यातील भटकंती कट्ट्याद्वारे मंगला शाळेत ‘प्रस्तरारोहणातील सुरक्षा’ या विषयावरील भटकंती कट्टा पार पडला. या वेळी राजेश गाडगीळ यांच्या अनुभवाने परखड मतांनी हा कट्टा रंगला होता. आपण प्रस्तरारोहण कशासाठी करतो हे नेमके कळायला हवं. सुळका सर झाला की माथ्यावर आपण केवळ ५ ते १० मिनिटे असतो; परंतु खरी कसोटी असते ती आरोहण करताना. या गोष्टीसाठी आपण मेहनत करायला हवी. उत्तम तंत्र शिकणे हा मूलभूत नियम पाळायला हवे, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी अनुभवांच्या माध्यमातून सर्वांना पटवून दिले.