
जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानाचे उद्घाटन
विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विक्रमगड हायस्कूल येथे जागरूक पालक, सुदृढ बालक या अभियानाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संदीप पावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विक्रमगड पंचायत समिती सभापती यशवंत कनोजा, गटविकास अधिकारी हनुमंत दोडके, आरोग्य अधिकारी निंबाळकर, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गायकवाड, विक्रमगड हायस्कूलचे प्राचार्य अजित घोलप आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानात तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, खाजगी नर्सरी, अंध व अपंग शाळा, आश्रम शाळा, मतिमंद मुलांची शाळा आदी ठिकाणी ० ते १८ वयोगटातील मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तरी संबंधित बालके व किशोरवयीन मुला-मुलींच्या पालकांनी आरोग्य तपासणीकरता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.