
न्यू इंग्लिश स्कूलचे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन
विरार, ता. (बातमीदार) : वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या १९७३ बॅचचे सुवर्ण महोत्सवी स्नेह संमेलन, वज्रेश्वरी जवळील ‘बलांग फार्म हाऊस’च्या गर्द वनराईत उत्साहात पार पडले. यात २७ वर्ग मित्र-मैत्रिणींचे पारंपारिक स्वागत करण्यात आले. यावेळी सगळ्यांना शाळेचा बिल्ला, टोप्या आणि पहिल्या स्नेहसंमेलनाचा सगळ्यांचा फोटो असलेला मग देण्यात आला. पन्नास वर्षाचे औचित्य साधून पाच गेम घेण्यात आले. या खेळांमधून पाच जणांचे सुप्त गुण प्रकाशात आले कधीही पुढे न येणाऱ्या पाच जणांनी कथन, गायन, नृत्य, अभिनय आणि भाषण केले. हेमा वणे यांनी ‘असे ठरले पहिले स्नेहसंमेलन’ यांची कथा आपल्या शब्दात प्रस्तृत केली. जेवणानंतर मृत्यूपत्राचे महत्त्व आणि ते कसे करायचे याचे मार्गदर्शन दिलीप परांजपे या वकील मित्राने केले. तसेच देहदान, नेत्रदान याचे महत्त्व व ते कसे करायचे याची माहिती उषा शेणाई यांनी दिली.