Mon, March 27, 2023

महामार्गावर स्वीफ्ट गाडीला आग
महामार्गावर स्वीफ्ट गाडीला आग
Published on : 13 February 2023, 11:50 am
कळवा, ता. १३ (बातमीदार) : मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या स्वीफ्ट गाडीला खारेगाव पुलाजवळ अचानक आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. भिवंडी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने दुर्घटना टळली आहे. स्वीफ्ट गाडीचे मालक शबिर शिद्धिकी यांच्या गाडीने वाहन चालक अकलक शेख तीन प्रवाशांना घेऊन सोमवारी पहाटे नाशिक येथे जात असताना खारेगाव पुलावर गाडी आल्यावर गाडीतून धूर निघत असल्याचे वाहन चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने प्रवाशांना खाली उतरवले. काही क्षणात गाडीने पेट घेतला. वाहतूक पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून नारपोली पोलिसांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. या संदर्भात नारपोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.