Sat, March 25, 2023

ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू
ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू
Published on : 13 February 2023, 12:00 pm
नवी मुंबई (वार्ताहर) : नेरूळ एमआयडीसीतून मोटरसायकलवरून कुकशेत गावाकडे जाणाऱ्या व्यक्तीचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी फरारी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेरूळमधील कुकशेत गावात राहणारे विनायक म्हात्रे (४१) एमआयडीसीतील इंडियन ऑईल कंपनीत कामाला होते. विनायक म्हात्रे दररोज दुपारी मोटरसायकलवरून घरी जेवणासाठी जात होते. गत शुक्रवारीदेखील ते घरी निघाले असताना वाडीलाल केमिकल कंपनीसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यात विनायक म्हात्रे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.