Tue, March 28, 2023

राज्यस्तस्तरीय मॅरेथॉनमध्ये अतुल चीभडे प्रथम
राज्यस्तस्तरीय मॅरेथॉनमध्ये अतुल चीभडे प्रथम
Published on : 15 February 2023, 8:01 am
जव्हार, ता. १५ (बातमीदार) : नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत तीन किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत जव्हार येथील आईश्री गुरुकुलच्या अतुल चीभडे या विद्यार्थ्याने चारही विभागातील विद्यार्थ्यांना मागे टाकीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकतीच नाशिक येथे राज्य स्तरीय आंतर शालेय क्रीडा स्पर्धा पार पडली. यात इयत्ता आठवीपासून आईश्री गुरुकुलने दत्तक घेतलेल्या अतुल चीभडेने हा विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांने निश्चयाचा जोरावर धावणे या मॅरेथॉन प्रकार निवडून त्यात प्रगती करत एक एक पाऊल पुढे टाकले आहे.