डिजिटलमुळे चित्रकलेला अवकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिजिटलमुळे चित्रकलेला अवकळा
डिजिटलमुळे चित्रकलेला अवकळा

डिजिटलमुळे चित्रकलेला अवकळा

sakal_logo
By

कासा, ता. १३ (बातमीदार) : सध्याचे डिजिटल युग असून प्रत्येक क्षेत्रामध्ये पेपरलेस कामे सुरू आहेत. त्याचबरोबर माणसांऐवजी मशीनच्या साह्याने अनेक कामे सुरू झाल्याने अनेक व्यवसाय बंद होऊ लागलेत. यात पारंपरिक ब्रशच्या साह्याने चित्रे काढणारे चित्रकार, विविध साईन बोर्ड लिहिणाऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांना तो व्यवसाय सोडून अन्य ठिकाणी कामासाठी जावे लागत आहे.
पूर्वी ब्रशच्या साह्याने चित्रे काढणारे चित्रकार अनेक ठिकाणी आपली कलाकारी दाखवत असत. यात दुकानांचे बोर्ड, हॉटेलचे बोर्ड, शासनाच्या योजनांचे व उपक्रमांचे भित्ती संदेश, विविध घरगुती रंगकामे, बॅनर हे सर्व हातानेच ब्रशच्या साह्याने करत असत. यातून मोठा रोजगार मिळत असे; पण आता डिजिटलमुळे अनेक गोष्टी मशीनच्या साह्याने, त्याचबरोबर अधिक सफाईदार आणि स्वस्त मिळू लागल्या आहेत. त्यामुळे पारंपरिक चित्रे काढणारे चित्रकार नामशेष होऊ लागले आहेत.

-----------------------
कमी वेळात स्वस्तात चित्रे
डिजिटलच्या या युगात चित्रकारांच्या व्यवसायावर कुऱ्हाड आली आहे. आज कमी पैशांत व कमी वेळेत वस्तूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानात जलद व सुंदर चित्रे कमी पैशांत मिळू लागल्याने हाताने ब्रशच्या साह्याने कलाकुसर करणाऱ्या कलाकारांवर इतर व्यवसाय शोधण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षे याच व्यवसायावर पोट भरणारे आता रोजगार मिळत नसल्याने गरिबीत जीवन जगत आहेत.

--------------
गेली अनेक वर्षे आम्ही हाताने ब्रशच्या साह्यायाने विविध चित्रे, नामफलक रंगवून उदरनिर्वाह करीत होतो; पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात सर्वकाही मशीनवर व कमी वेळेत आणि कमी पैशांत बनू लागल्याने आमचा व्यवसाय जवळपास बंद झाला.
- अरविंद पेंटर, व्यावसायिक