महापालिकेच्या सात कर्मचाऱ्यांना पदोन्नती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या सात कर्मचाऱ्यांना पदोन्नती
महापालिकेच्या सात कर्मचाऱ्यांना पदोन्नती

महापालिकेच्या सात कर्मचाऱ्यांना पदोन्नती

sakal_logo
By

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या सात कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते या कर्मचाऱ्‍यांना पदोन्नतीचे पत्र देण्यात आले. यावेळी आमदार गीता जैन उपस्थित होत्या.
मिरा-भाईंदर महापालिकेत गेली अनेक वर्षे कर्मचाऱ्‍यांच्या पदोन्नतीचा विषय प्रलंबित होता. अनेक कर्मचारी पदोन्नतीशिवायच निवृत्त झाले आहेत. आयुक्त दिलीप ढोले यांनी पदाचा कारभार हाती घेताच पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपायुक्त मारुती गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्मचाऱ्‍यांच्या सेवापुस्तिकांचे काम सर्वप्रथम मार्गी लावले. त्यानंतर सेवाज्येष्ठता यादी तयार करुन टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्‍यांना पदोन्नती दिली. सोमवारी अग्निशमन विभागातील जगदीश पाटील यांना अग्निशमन केंद्र अधिकारी, आरोग्य विभागातील अरविंद चाळके यांना स्वच्छता अधिकारी, त्याचप्रमाणे संजय भोये, विनोद सामंत, गजानन भोसले, हेमंत हंबीर, शर्मिला गायकर यांना वरिष्ठ लिपीक या पदावर पदोन्नती देण्यात आली. या सर्वांना आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते व आमदार गीता जैन यांच्या उपस्थितीत पदोन्नती पत्रे देण्यात आली. आता काही अपवाद वगळता आस्थापनेवरील जवळपास सर्व कर्मचाऱ्‍यांच्या पदोन्नतीचा विषय मार्गी लागला आहे.