Sat, March 25, 2023

पाच हजार ४८३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
पाच हजार ४८३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
Published on : 13 February 2023, 11:35 am
पालघर, ता. १३ (बातमीदार) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार सर्व माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्यात २० फेब्रुवारीपासून आरटीईकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेत नर्सरी आणि पहिलीकरिता एकूण २६६ शाळा असून त्यामध्ये एकूण पाच हजार ४८३ जागांपैकी पाच हजार ३८० जागा पहिलीसाठी, तर १०३ जागा नर्सरीकरीता असल्याची माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष तथा शिक्षण व वित्त समिती सभापती पंकज कोरे यांनी केले आहे.