Thur, March 30, 2023

वडाळ्यातील पालिका कार्यालयाच्या कचरा युनिटला आग
वडाळ्यातील पालिका कार्यालयाच्या कचरा युनिटला आग
Published on : 13 February 2023, 11:46 am
वडाळा, ता. १३ (बातमीदार) ः वडाळा रेल् स्थानकाजवळील मुंबई महापालिका एफ, नॉर्थ विभागाच्या कार्यालयाच्या कचरा युनिटला सोमवारी (ता. १३) अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आरएके मार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, वडाळा रेल्वे पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. ४० मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग वडाळा रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एकच्या रेल्वे रुळाजवळील सुक्या गवताला लागून पसरली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र कार्यालयात आग पसरू लागल्याने पालिका कर्मचाऱ्यांनी सर्व सामान कार्यालयातून तात्काळ बाहेर काढले.